गाफिल राहिलेला सोलापूर जिल्हा…
अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट होती मात्र ” कितीही मार पण मला काही लागतच नाही…” असं म्हणत मार साहन करणारी लहानगी मुलं आठवली असं काहीस सोलापूर जिल्हाच झालंय त्यात आता प्रशासनाला दोष देण्यात तरी काय उपयोग…”पहिले तुम पहिले तुम करण्यात गाडी निघून गेली.” अंधानुकरण म्हणजे आचरण नव्हे… आचरण म्हणजे कृतिप्रवणता आणि कृती तीच योग्य असते जी समाज मान्य असते. समाज समजण्यासाठी समज असावी लागते आणि समज अशीच येत नाही त्यासाठी अनुभव असावा लागतो, प्रत्येक अनुभव स्वतःला मिळवता येत नाही त्यासाठी दुसऱ्यांची मत देखील ऐकावी लागतात, मात्र सगळीच मत देखील बरोबर नसतात परिणामी मान्यता, सत्यता आणि त्रिकालबाधितात या आधारावर अनुभव पडताळावा आणि योग्य तेच अनुकरण करावे तरच ते अनुकरण ठरेलं अन्यथा ते अंधानुकरण ठरेलं… म्हणून आचरण योग्य असलं तरच आपण जनसामान्यास मान्य असुत ही गोष्ट सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत राजकीय आणि अधिकारी वर्गाला नजरेआड करून जमणार नाही. एकही पेशन्ट नसलेला जिल्हा म्हणून काही दिवसांपूर्वी बिरुद मिळवलेलं सोलापूर शहर आज सश्याच्या नव्हे तर चित्याच्या वेगाने वाढत आहे. अनेकदा आपण अपवादाला ही अपवाद होण्याचा प्रयत्न करतो मात्र तसं काही होत नाही घडत ते उलटंच… इथं झालंय काय कि आम्हाला नेमका कोरोनाचा उगम कुटून होतेय तेच कळत नाही म्हणजेच काय तर “we can’t tress the origin member or affected persons” आता भरीत भर अशी की या शहराचा वान मुळात उध्दट असा आहे असे मत कथित बघ्याच्या भूमिकेतील लोकांच आहे आणि त्यात जश्यास तसं वागायची पद्धत; मात्र एक गोष्ट चांगली पळाली ती म्हणजे “social distance” ; क्षमस्व काही लोकांचा social हा शब्द वापरन्यासाठी विरोध आहे त्यातल्या त्यात आज सोलापूर विषयी बोलतोय तर आधीकच जपून रचना करावी लागते आहे…मुळात विषय असा आहे की इतर शहरांत lockdown काहीस शिथिल झालं आहे आणि नेमक्या याच सरते शेवटी च्या दिवसांत सोलापुरात थोडा कचाटा आवळला भाग पडत आहे आणि पुण्यापेक्षा जास्त ग्रामीण भाग जवळ आहे, रोजच्या संपर्कात आहे. सर्वाधिक उसाचे कारखाने असलेला, अनेक राजकीय व्यतिमत्व आणि अधिकारी असलेला जिल्हा मात्र इच्छा शक्तीने कमी पडणारा. आता काळजी सारखा विषय म्हणजे विनाकारण पसरणाऱ्या अफवा त्यांना मात द्यावी लागणार आहे त्या साठी रेडिओ टीव्हीसंच समाजमाध्यमांचा वापर करावा लागेल ; सीमा तंगड बंद ठेवाव्या लागणार आहेत कारण बऱ्याच ठिकाणी हा जिल्हा नादी व रस्ते मार्गानी छेदलेला आहे ; दैनंदिन आचरणाच्या सवयी विषयी समज द्यावी लागणार आहे sanitizer आणि हॅन्ड वॉश चा वापर त्यात महत्वाचे सर्वाधिक कारखाने असलेला जिल्हा म्हणवून घेण्यात काहीच मजा नाही कारण असली बिरुद आज असतात तर उद्या नसतात तर या कारखान्यात sanitizer बनवून घरोघरी पोहचवा जरी शेअर्स ची एखाद किलो साखर कमी दिली तरी चालेल ; आरोग्य सेवा foot stape वर आणाव्या लागणार म्हणजे ऍम्ब्युलन्स आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची आणि सरकारी डाँक्टर्स ची 24तास सेवा ; न ना चा पाढा सोडून लागणीचं मूळ शोधावं लागेल ;
सर्वात पाहिलं कोरोना मुक्त झालेलं राज्य गोवा आहे तसंच सर्वाधिक कोरोना लागत होणार राज्य महाराष्ट्र आहे हा विरोधाभास लक्षात घ्यावा लागेल कारण आपल्या मुळे इतर कोणाला या आजाराची लागण न होऊन देणे हे आपलं कर्तव्य आहे हीच गोष्ट आधी तथाकथित शेजारच्या जिल्हांच्या लक्षात आली असती तर सोलापूर ची ही अवस्था झाली नसती. मग सरते शेवटी एक गोष्ट सांगावी लागते की…..विचार आणि आचरण यात तीळमात्र फरक आहे फरक कोणता तर विचार केवळ बुद्धीत असतात आणि आचरण कृतीत.
नितीन नागटिळक 4th मे 2020