कोरोना विशेष

आजचा लेख कोरोना विशेष…
माझं बालवाडी ते सातवी चं शिक्षण मुंबई शहराचे उप शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई मध्ये झालं, ते उपशहर कसलं !!! तर मुंबई शहारा चा भर कमी करण्यासाठी वसवलेली एक औदयोगिक वसाहत होती जी सिडको अंतरगत विकसित झाली होती. हे झालं 30 वर्षांपूर्वीच आता विषय असा की हे सांगायचं कारण काय तर ” मुंबई “!!! आता या मायानगरी वरचा भर वाढला आहे आणि परत तश्याच एका नव्या मुंबई ची गरज आहे मात्र हे आता काही सहज शक्य नाही दिसतंय आणि बालवाडी चा विषय का तर या इयत्ते पासून चवथी पर्यंत असलेला विषय “आपले परिसर”!!! या विषयामध्ये आम्हाला सगळं काही शिकायला मिळालं म्हणजे काय तर हात कसे धुवावे ते कपडे का इस्त्री करावे आणि साथीचे रोग ते संसर्ग काय इथं पर्यंत; हा विषय आता अभ्यासक्रमा मधून वागला आहे हो. सुफेन आणि दुश्फेन पाण्यातील फरक पण सांगावा या विषयामध्ये ! आता झालंय असं की शिक्षणाचा उपयोग फक्त्त भाकरी मिळवून देण्या इथपत चं राहिला आहे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी? करा नवीन विषयाची ओळख काय तर पेर्सोनालिटी डेव्हलोपमेंट ! मित्रहो आपल्या 12 वी च्या संसान्स च्या पुस्तकात या तथाकथित कोरोना आजाराचा उल्लेख आहे ! मात्र ते दुर्लक्षित राहिलं. आज या आजाराने आख्या जगात थयमान घातलं आहे, खरंच का हा आजार एवढा भयानक आहे तर हो कारण काय तर एकच “वेळ असतांना केलेलं दुर्लक्ष !” मग आता काय? काही नाही ! तुम्ही पाडलेलं संशोधनामधलं आंतर आता प्रत्येकाने एकमेकांनमध्ये ठेवायचं आणि संसर्ग टाळायचा ! साथीच्या रोगांसाठी लस असते संसर्गासाठी नसते त्यासाठी एकच असतं ते स्वतःला ओळखायचं आणि संपर्क टाळायचा. आपल्या पंतप्रधानानी आज संकल्प दिवस ठरवला याच काय कारण असेल तर एकच कारण आहे की कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी आपण निश्चय करायचा आणि तो पाळायचा हे झालं आपल्या  मानसिक सामर्थ्यासाठी पण आजून पुढं काय मांडलं आहे याच गणित कोणालाच माहित नाही आजच चीनने शोकदिन पळाला होता ते पण एक मानसिक दायीत्व होतं समाजासाठी. समाज असेल तर आपण असुत नाही तर काही नाही हे आता या आजाराला तोंड देणाऱ्या कुटुंबालाच कळत असेल बाकी सगळेच बघ्याच्या भूमिकेलीत श्रोते आहेत ( श्रोते आवारजून म्हणातोय कारण दिसत असतं तर आपण विपर्यास नसता केला ) सर्वकाही दिसूनही तोच मूर्खपणा असेल तर आपण डोळस मूर्ख आहोत हे नक्कीच. परिणामी संपर्क टाळा शहरांवरचा वाजवी भार टाळा. रोजगार मिळवा पण आपला खर्च (Expenditure) याचा पण विचार करा. आज आपला गाव बरा असं म्हणायची वेळ आली आहे कारण काय तर लोकसंख्येची कमी घनता ! स्वछ आणि पोषक खा, गरज असेल तर प्रवास करा यात पर्यटन हा विषय वेगळा…तुम्हाला जर आज कोणी फुकट विजा आणि पासपोर्ट दिला व सांगितले की ये चायना, अमेरिका, फ्रांस,  मलाया, अबुधाबी फिरून तर नक्कीच आपलं उत्तर नको असेल, आता का नको? कारण हा आजार द्याल पण वास्तव ते नाही गरज नसताना का फिरू हे असणार, परिणामी गरज आणि स्वच्छता या आजच्या घडीला एका नाण्याच्या दोन बाजू झाल्यात. मी मनस्वी भारताच्या आर्या कुळाचे आभार मानतो कारण यातच आपल्या स्वच्छतेची  आणि प्रार्थना पावित्र्य आणि कर्माची सांगड घातली आहे नाही तर आपण आज पूजेला हातपाय धुवून नसतो बसलो ! शासन आपल्यापरीने प्रयत्न करत आहे आपण ही त्यात सामील होऊन समाज टिकवावा आणि राष्ट्र बांधणीत योगदान द्यावे, नाही तर आपली फसगत “मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा” अशी झाल्या शिवाय राहणार नाही कारण हॅन्ड वॉश विकणारी अमेरिका आज हजारो च्या पटीने चितपट होतेय आणि 150 वर्ष राज्य केलेल्या युरोपचे कथित युवराज व पंतप्रधान पण संसर्गाची लागण होऊन घरात बसलेत… म्हूणन मित्रांनो जागा राष्ट्र घडवा पिढ्या सुधरवा…..
जय हिंद जय भारत !

by:नि 3

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started