सलाम दातृत्वाला आणि त्यांच्या कर्तुत्वाला…!

सलाम दातृत्वाला आणि त्यांच्या कर्तुत्वाला…!

माणसाचं आयुष्य हे शेतातल्या पिकासारखं असतं, ज्याला वर्षभरा आधी वेळेच्या वसरूपात गुंतवावं लागतं मग नंतर कापनीच्या वेळी यशाची जग्गड फळं मिळतात…मात्र काही कारणानी आयुष्य काळजीने घेरल जातं…विशेष तर आपण ज्यांच्या सहवासात आहोत त्या लोकांच्या भूत, भविष्य आणि वर्तमानतीत माहितीने वा वागण्याने. दुःख याच नाही की काळजी पडली आहे तर दुःख याच आहे की “आपण जिथं वेळ गुंतवतोय तिथं ती गुंतवण्यात कमी पडतोय का…? की मी चुकतोय योग्य ठिकाणी वेळ गुंतवण्यात…? गरज होती की नव्हती या पेक्षाही हीच योग्य वेळ होती का…?” या विवंचनेने व्यतीत होतो. आपलं वागणं आपल्या हातात असतं मात्र दुसऱ्याचं नाही. आपण कितीही समजदारी दाखवली तरी त्यांना फरक फारसा पडत नाही कारण ते त्यांच्याच विश्वात जगत असतात त्यांना तुमच्या विचारांचं सोडाच स्वपनांशी ही काही देणंघेणं नसतं. परिणामी हतबल होऊन जेंव्हा आपण हात टेकतो तेव्हा माघून नेहमीच धीर देणारा आणि कायम प्रेरित करणारा आवाज येतो… जे स्वप्न तू पाहिलं आहेस ते तुझं एकट्याच नाही आमचं देखील आहे तू एकटा नाही हरणार आम्ही पण हारुत; तूला आवरायचंय स्वतःला आणि पुन्हा भरारी घ्यायची आहे त्या राखेतल्या खसकन उडणाऱ्या फिनिक्स पक्ष्या सारखी; प्रवास कितीही समुद्र पार करण्याचा असो तूला अशी मुभा नाही की तू समुद्रात आत्माहूती देऊन या भौतिक जगाचा निरोप घ्यावा तर तूला मुभाच तेंव्हा आहे जेंव्हा तू जिंकशील आणि या भावविश्वाला ओलांडशील…! सलाम अश्याच व्यक्तिमत्त्वांना जे कायम प्रेरणा देतात, धीर देतात आणि आपल्याला कितीही अवघड प्रसंग आला तरी लढण्याची ताकद देतात…!

By: नि3

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started