लेख : गणेशोत्सव आणि आपण
महिन्याभरा पूर्वी 1ऑगस्ट होता तिथी विशेष लो. टिळकांची पुण्यतिथी आणि उद्या 2 सप्टेंबर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन. वास्तविक पाहता टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली आणि घराघरातील बाप्पा सार्वजनिकरित्या बसवला जाऊ लागला खूप चांगलं झालं जाती धर्माच्या भिंती नावाला का होईना पण कमी झाल्या आज त्या पाळल्या जातं नाहीत असं आपण समजू…मात्र बाप्पाचं काय !!! आज सार्वजनिक गणेशोत्सव प्रत्येक चवका-चवकात आला आणि आता त्याचं एवढं generalisation ( मराठीत समजत नाही!!! इंग्लिश मध्ये सांगू??? generalisation म्हणजे सामान्यीकरण ) झालं की तो आता गेलो-गल्लीत बसवला जाऊ लागला ! बसवा काहीच हरकत नाही पण बाप्प्पाला आपण आणतो सोडायला जातो तेंव्हा बरेच प्रश्न आपल्या समोर येतात पहिला तर law nd order चा त्या नंतर स्वच्छतेचा आणि शेवटी वेगवेगळ्या प्रदूषणाचा !
“पण बाप्पाला daring होतं नाही बरं का तुम्हाला असं का? म्हणून विचारायची कारण तुम्ही रीतसर मंडळ नोंदवलेली असतात; त्यातून काही चूक जिला वास्तवात चूक असं म्हणतच येत नाही आणि म्हणालातच तर देव पाप करतो वगैरे…वगैरे…ती चूक नसतेच ओ तिला काही म्हणताच येत नाही ती देवावरची श्रद्धा असते बरं पुढं…पण बाप्पाला तुम्हाला ” असं का? ” हा प्रश्नच विचारता येत नाही जरी काही चूक झाली तर त्या चुकीची भरपाई तुम्ही दंड म्हणून देता आता कुणाच्या मनात पुण्याचा दगडूशेठ आला असेल तर तो एक योगायोगच म्हणावा मात्र तसं नाही शेवटी बाप्पा एकदाच तर येतात की हो !
बाकीच्या सगळ्या गोष्टींना handle करायला मंडळाचे अध्यक्ष समर्थ असतात मग ते कोणत्याही प्रकारची तयारी ठेवतात “साम-दाम-दंड-भेद” बाप्पासाठी आमची लोकं भीत नाहीत कुणाच्या पप्पाला चालू द्या हाच आदर्श आहे आपण आपल्या थोर विचारवंतांकडून घेतलेला शेवटी आपण टिळकांचाच आदर्श घेतलाय “मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफली नाही उचलणार”
लेख उपरोधात्मक आहे कुणाला दुखावण्यासाठी नाही मात्र समजावण्यासाठीच ! या संस्थे मार्फत बऱ्याच समाजोपयोगी गोष्टी हाती घेतल्या जातात आपण अशा समाज कार्यात सहभागी होऊन सामाजिक आदर्श घालावेत जेणे करून पुढच्या पिढीला आदर्शांची ओळख राहील !