स्पर्धाकांनो थोडं धीराने घ्या!

” ताई मी कलेक्टर होवानू! ” या शब्दात जेवढ गांभीर्य आहे तेवढाच दुःखाचा सागर तरुन आल्याची भावना देखील आहे. स्पर्धा परीक्षा हे बिरुद खूप फसव आहे हा ज्याचा त्याला आलेला अनुभव आहे, जीवनाचा परित्याग आणि यशाची आशा या मधील एक लांब पल्ल्याचा प्रवास देखिल आहे. त्यात एक यश आणि दुसरं अपयश कारण हजारोच्या संख्येने धावणाऱ्याच्या शर्यतीत केवळ पहिल्यांचाच विचार होतो इथं; 8-10 वर्ष अभ्यास करून शेवटी हाती काहीच न घेता परतत असताना त्या विद्यार्थ्यांची अवस्था एका शरीरावर बलात्कार झाल्या सारखी असते ते कोणालाच कळणार नाही, माग अशा निराश मानपुढे पर्याय उरतो तरी कोणता? हे कटू सत्य आहे मात्र या सत्याला ही पाणी पाजण्याची लढवंयी भूमिका आपली असली पाहिजे.अरे आपलं दुःख काय आपण सगळ्यांना सांगत बसतो का जे काही असेल ते आपलं आपल्यालाच माहिती असतं आणि जरी कुणाला सांगितलं तरी त्याचा उपयोग तरी काय होतो कोणी केलीच तरी तात्पुरती मदत एवढंच काय ते; का कोणी आयुष्याला पुरतं? लोकं याकून घेतात आणि फार तर सहानुभूती व्यक्त करतात पण परत आपलं आपल्यालाच पाहावं लागतं ना! या जगात आपल्या रथचा सारथी ही आपणच आणि प्रवासी ही आपणच असतो. जग केवळ बघ्याच्या भूमिकेत असतं. कोणी आला काय आणि गेला काय काही फरक नाही, काही काळ भावना व्यक्त केल्या की झालं, कुणाच्या मारणाने हे जग थांबत ही नाही आणि येण्याने सुधरत ही नाही. मरणा नंतर 13 दिवस अगर फरफार तर वर्ष त्या नंतर प्रत्येक जण विसरतो उरतात त्या केवळ तारखा,जयंती आणि पुण्यतिथी! सगळा मोहमायेचा बाजार! नशिबाने आणि आपल्या आई वडिलांच्या पुण्याईने आपणास मानव जन्म मिळाला आहे त्याला असंच वाया नका घालवू अभ्यासू वृत्ती जगी करा सखोल, खोचक आणि तेवढीच खेळकर : कारण खेळकर प्रवृत्ती ने पाहिल्यासा त्रासात पण एक वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येक विद्यार्थी कोणत्याना कोणत्या त्रासाला तोंड देतोच आहे. आर्थिक, कुठं सामाजिक, तर कधी मानसिक पण हा नुसता पाहिला तर त्रास आहे पुढे लागलीत ती त्या त्रासाची भूषणे आहेत. सर्वात वाईट आणि स्वतःला कमजोर करणारी गोष्ट म्हणजे भांडवल करणं कारण ज्या दिवशी तुम्ही एखाद्या गोष्टीच भांडवल केलं अगर झालात तर समजून जा की तुम्ही एका भयाण चक्रव्हिव्हात अडकलात. निर्णय घेता येत नसेल तर थोडं थांबा सर्व गोष्टींवर लक्ष द्या,बरकावे अभ्यासा आणि महत्वाचं म्हणजे मन अगदी तथागत ठेवा कारण एका बाजूला कललेली होडी त्याच बाजूला पडते तेंव्हा तथागत म्हणजेच तटस्थ राहून विचार करा. मनामधली नकारात्मकता काढून टाका, त्यासाठी अनेक मार्ग आहेत. एकच लक्षात ठेवायचं आपल्या चेहऱ्यावरच हसू सगळ्या जगाला आणि स्वतःला जगण्याची एक उर्मी देतंय बस.” यश असो अगर अपयश या दोन शब्दांमध्ये केवळ ‘ अप ‘ वगळता दोन्ही बाजूना यश आहे.” मित्रांनो धीराने घ्या थोडं कोणतीही परीक्षा ही आपलं व्यक्तिमत्व घडवत असते, व्यसंगी, चवफेर वा अष्टपैलू म्हणालात तरी चुकीचं नाही. जरी हे सगळं करताना नाहीच मिळाली post तर या जगाला स्पष्ट माथ्याने सांगायचं ” अनुभव विकत घेतला म्हणजेच लतादीदींच गाणं म्हणायचं विकत घेतला शाम बाई मी ” पण ओठांवर एक गाणं ठेवायचं ” हम होंगे कमियाब… एक दिन….. एक दिन “

By: नि3

शर्यतीचा घोडा…

आज एक कथा सादर केली आहे ती केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांना देखील तंतोतंत लागू पाढेल अशी आहे…  ‘एक घोड्याचा खरेदीदार असतो, तो बाजारात एक सुंदर असणाऱ्या घोड्या पेक्षा शर्यतीत नाव गाजवणार असा घोडा शोधात असतो जर त्याला सुंदर आणि कर्तबगार घोडा मिळाला असता तर त्याचे नशीबच फळफळले असते, बाजार म्हंटल्यावर अनेक विक्रेते त्या बाजारात आपला घोडा घेऊन आलेले असतात काही घोडे सुंदर असतात तर काही घोडे शर्यत गाजवलेले असतात मात्र त्या खरेदीदारास मनाला भावून जाईल असा कोणताच घोडा पसंद पडत नाही परिणामी तो आणखीन घोडे पडताळून पाहत असतो मात्र त्याचा भर कर्तबगारी वर असतो शेवटी त्याला तसा द्विज साधता येत नाही म्हणून तो एका कर्तबगार घोड्याची खरेदी करतो त्याला त्या घोड्याच्या विक्रेत्याने आपला घोडा कर्तबगार आहे असं भासवून आपला घोडा विकलेला असतो ज्या वेळी तो घोड्याची खरेदी करणार त्या वेळी त्याने पडताळणी म्हणून त्याची चाचणी घेतलेली असते त्या वेळी तो पास ही होतो कारण काय असेल तर त्या घोड्याला तेवढाच शिकवलेलं असतं आणि शेवटी तो घोडा खरेदी ही करतो घोडा जेमतेमच असतो मात्र त्या खरेदीदारास आशा असते ती तो घोडा शर्यतीत चमकणार याची मात्र जेंव्हा घोडा शर्यतीत उतरवला जातो तेंव्हा तो घोडा आपल्या नव्या मालकाला तोंडचीत पाडतो तेंव्हा त्या घोड्याचा मालक नाराज होतो आणि आपल्या नशिबाला दोष देतो काही काळ गेला तरी घोडा काही आपली प्रगती करू शकत नाही मग मालक आपला राग काढणार तरी कोणावर एक तर घोड्यावर नाही तर जुन्या मालकावर कारण त्याला त्याची फसगत झाल्याची भावना सतत सतावत असते आणि घोडा काही सुधार नसतो उलटपक्षी घोडा त्या मालकाशी हुज्जत घालत विषय वाढवत असतो, मालक म्हणतो की मी तूला हिरवा चारा देईन पण पेंड माझ्या ऐपतीत नाही, रोज नाही मात्र कधी मधी मी तुला नक्कीच पेंड देईन, हो मात्र तुझा चण्याचा चारा कधीच चुकू देणार नाही मात्र घोडा आपेक्षाखोर असतो आणि तो आपला वेळ वैभवविलासित होण्यात घालवतो आणि कर्तबगारीत मागेच राहतो, आता मालक तर मालकच राहणार ना मग नवा मालक जुन्या मालकाला आणि घोड्याला धारेवर धरतो, घोड्याची पिटाई आणि मालकाची बदनामी चालू होते सरते शेवटी मालक घोडा विकण्याचा निर्णय घेतो मात्र तो आपल्या सुद्धबुद्धीला पटेल असा निर्णय घेतो, तो घोडा जुन्याच मालकाला परत विनामोबदला पाठवण्याच्या निर्णय घेतो पण घोड्याला जुन्या मालकाकडे जायचे नसतं कारण त्याने पक्क ओळखलं असतं की आपला उद्धार याच मालकाकडे होणार जुन्या मालका जवळ नाही शिवाय त्या कळत नव्या मालकाशी त्याची जवळीक ही वाढलेली असते, नवा मालक आता विषय लांबवण्याच्या तयारीत असतो आणि घोड्याला काही जायच नसतं मग नवा मालक घोड्याला काही न बोलता अबोला ठेवतो आणि स्वतःला दुसऱ्या कामात गुंतवून घेतो काही काळ गेला की घोडा स्वतः मध्ये बदल करून घेत प्रगती साधण्याचा प्रयत्न करत असतो मालकच त्याच्यकडे लक्ष असतं मात्र ते फक्त्त डाव्या कानाने; एक क्षण असा येतो की घोडा शर्यतीत भाग घेऊन शर्यत जिंकतो आणि तो मालकाच्या आणि त्या घोड्याच्या आयुष्यातला सर्वात अनमोल क्षण असतो… आता प्रश्न मालकाने घोड्याला जवळ करण्याचा आणि त्याच्या प्रयत्नांचा असतो तर तिकडे घोड्याने घोड्याच्या मालकाला माफ करण्याचा आणि त्या घोड्याला चमकावण्यासाटी दिलेल्या प्रेरणेचा असतो…’ गोष्ट इथंच संपली फारशी आकलनीय नाही मात्र बोधक नक्कीच आहे कारण ही कथा कोणाला लागू होते ते प्रत्येकाने विचार करावा आपल्या दैनंदिन जीवनात तिला लागू करून पाहावे ज्याला त्याला आपलं आयुष्य आहे ते जगणायचा अधिकार आहे मात्र आपल्या कडून काहीकांच्या काही अपेक्षा आहेत त्या ही विचारात घ्याव्यात, आपण काही मागण्या आधी एखाद्या जबाबदारी च्या पत्र होण्याचा पर्यंत करावा, काही कामात initiative पुढाकार घ्यावा, काही कामात प्रेरणा support  द्यावी, काही कामं स्वतः हाताळावी, आपल्या मागील आयुष्याचा गोडवा सोडून नव्या संधींची कास धारावी, सुखाने खाल्लेलं सगळंच गोड असतं मात्र कष्टाने मिळवून खाल्लेलं निश्चितच चविष्ट असतं…थोडक्यात मी म्हणेल की Michel Cluizel Chocolates पेक्षाही आमच्या गावठी गुळाच्या गुऱ्हाळात शेवटी कढईला चिकटून करापलेलं गूळ जो चव देतो ना ते जगातला कोणतंच चॉकोलेट देत नाही… जी चव बासुंदी ची साय देते ती दहादा milkibar chocolate च्या तोंडात मारते. जे स्व कष्टाचं असतं त्या पेक्षा better best काहीच नसतं…आज महिलांच्या आयुष्यत अनेक घडामोडी घाडतायेत आणि tv serial वर ही त्या गाजत आहेत मात्र माझा आक्षेप आहे तो Extramarital affairs च्या कथांवर कारण आपण 7 जन्म च्या फेऱ्या वाढा च्या झाडाला time pass म्हणून घेतलेल्या नसतात, मान्य आहे अपेक्षित नाही मिळालं पण जे मिळालं ते विकसित करण्याचा प्रयत्न करणं आपलं कामं duty आहे, आणि त्यासाठी आयुष्य भर ते करावं लागलं तरी वाईट काय ! अपेक्षा आणि इच्छा जरी एक समान शब्ध वाटतं असले तरी त्यात ईर्षा आणि मोह एवढा च फरक आहे…इथं जगातला प्रत्येक व्यक्ति तुम्हाला सोनं म्हणून मती विकणार आहे मात्र आपण त्या मातीच सोनं कसं करायचं ते ठरवायचं असतं… ही कथा आई वडील, भाऊ बहीण, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी, आणि जगातल्या प्रत्येक नात्याला लागू होते. ज्यांनी ईर्षेने पेटून इतिहास घडवला त्यांच नावही तितकाच मोठ आहे जेवढा त्यांचा त्रास पण एवढं मिळवून ही ते एकटेच राहिलेत हे तितकाच खरं जर खरं वाटतं नसेल तर सारनाथ चा अशोकस्तंभ आठवून पाहा तो आपल्या राजाची कहाणी सांगेल आणि ज्यांनी एकमेकांना साथ देऊन चाल केली ते अपयशी झाले तरी आनंदी होते एवढं खरं उदाहरणा खातर सांगायचं तर Barack and Michelle Obama आणि रोहित शर्मा आणि रितिका, समज सर्वांनाच आहे आता गरज आहे ती स्वतःला वयक्तिक न समजता म्हणजेच centralized न करता थोडं सामाजिक होण्याची, माय माऊलीला आया बहिणींना, आणि बंधू भावना नक्कीच या वाचनाचा फायदा होईल ही आशा करतो आणि पूर्णविराम देतो कारण कुठं तरी म्हंटल आहे ” जी जगाला उद्धरी तिच्या हाती पाळण्याची दोरी ” खूप अर्थपूर्ण विधानं आहे कारण तिच आई असते तर तिच पत्नी ही एक संस्कार करते तर एक हात धरून लढते ही.

By: नितीन

गाफिल राहिलेला सोलापूर जिल्हा…

गाफिल राहिलेला सोलापूर जिल्हा…

अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट होती मात्र ” कितीही  मार पण मला काही लागतच नाही…” असं म्हणत मार साहन करणारी लहानगी मुलं आठवली असं काहीस सोलापूर जिल्हाच झालंय त्यात आता प्रशासनाला दोष देण्यात तरी काय उपयोग…”पहिले तुम पहिले तुम करण्यात गाडी निघून गेली.” अंधानुकरण म्हणजे आचरण नव्हे… आचरण म्हणजे कृतिप्रवणता आणि कृती तीच योग्य असते जी समाज मान्य असते. समाज समजण्यासाठी समज असावी लागते आणि समज अशीच येत नाही त्यासाठी अनुभव असावा लागतो, प्रत्येक अनुभव स्वतःला मिळवता येत नाही त्यासाठी दुसऱ्यांची मत देखील ऐकावी लागतात, मात्र सगळीच मत देखील बरोबर नसतात परिणामी मान्यता, सत्यता आणि त्रिकालबाधितात या आधारावर अनुभव पडताळावा आणि योग्य तेच अनुकरण करावे तरच ते अनुकरण ठरेलं अन्यथा ते अंधानुकरण ठरेलं… म्हणून आचरण योग्य असलं तरच आपण जनसामान्यास मान्य असुत ही गोष्ट सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत राजकीय आणि अधिकारी वर्गाला नजरेआड करून जमणार नाही. एकही पेशन्ट नसलेला जिल्हा म्हणून काही दिवसांपूर्वी बिरुद मिळवलेलं सोलापूर शहर आज सश्याच्या नव्हे तर चित्याच्या वेगाने वाढत आहे. अनेकदा आपण अपवादाला ही अपवाद होण्याचा प्रयत्न करतो मात्र तसं काही होत नाही घडत ते उलटंच… इथं झालंय काय कि आम्हाला नेमका कोरोनाचा उगम कुटून होतेय तेच कळत नाही म्हणजेच काय तर “we can’t tress the origin member or affected persons” आता भरीत भर अशी की या शहराचा वान मुळात उध्दट असा आहे असे मत कथित बघ्याच्या भूमिकेतील लोकांच आहे आणि त्यात जश्यास तसं वागायची पद्धत; मात्र एक गोष्ट चांगली पळाली ती म्हणजे “social distance” ; क्षमस्व काही लोकांचा social हा शब्द वापरन्यासाठी विरोध आहे त्यातल्या त्यात आज सोलापूर विषयी बोलतोय तर आधीकच जपून रचना करावी लागते आहे…मुळात विषय असा आहे की इतर शहरांत lockdown काहीस शिथिल झालं आहे आणि नेमक्या याच सरते शेवटी च्या दिवसांत सोलापुरात थोडा कचाटा आवळला भाग पडत आहे आणि पुण्यापेक्षा जास्त ग्रामीण भाग जवळ आहे, रोजच्या संपर्कात आहे. सर्वाधिक उसाचे कारखाने असलेला, अनेक राजकीय व्यतिमत्व आणि अधिकारी असलेला जिल्हा मात्र इच्छा शक्तीने कमी पडणारा. आता काळजी सारखा विषय म्हणजे विनाकारण पसरणाऱ्या अफवा त्यांना मात द्यावी लागणार आहे त्या साठी रेडिओ टीव्हीसंच समाजमाध्यमांचा वापर करावा लागेल ; सीमा तंगड बंद ठेवाव्या लागणार आहेत कारण बऱ्याच ठिकाणी हा जिल्हा नादी व रस्ते मार्गानी छेदलेला आहे ; दैनंदिन आचरणाच्या सवयी विषयी समज द्यावी लागणार आहे sanitizer आणि हॅन्ड वॉश चा वापर त्यात महत्वाचे सर्वाधिक कारखाने असलेला जिल्हा म्हणवून घेण्यात काहीच मजा नाही कारण असली बिरुद आज असतात तर उद्या नसतात तर या कारखान्यात sanitizer बनवून घरोघरी पोहचवा जरी शेअर्स ची एखाद किलो साखर कमी दिली तरी चालेल ; आरोग्य सेवा foot stape वर आणाव्या लागणार म्हणजे ऍम्ब्युलन्स आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची आणि सरकारी डाँक्टर्स ची 24तास सेवा ; न ना चा पाढा सोडून लागणीचं मूळ शोधावं लागेल ;
सर्वात पाहिलं कोरोना मुक्त झालेलं राज्य गोवा आहे तसंच सर्वाधिक कोरोना लागत होणार राज्य महाराष्ट्र आहे हा विरोधाभास लक्षात घ्यावा लागेल कारण आपल्या मुळे इतर कोणाला या आजाराची लागण न होऊन देणे हे आपलं कर्तव्य आहे हीच गोष्ट आधी तथाकथित शेजारच्या जिल्हांच्या लक्षात आली असती तर सोलापूर ची ही अवस्था झाली नसती. मग सरते शेवटी एक गोष्ट सांगावी लागते की…..विचार आणि आचरण यात तीळमात्र फरक आहे फरक कोणता तर विचार केवळ बुद्धीत असतात आणि आचरण कृतीत.

नितीन नागटिळक 4th मे 2020

कोरोना विशेष

आजचा लेख कोरोना विशेष…
माझं बालवाडी ते सातवी चं शिक्षण मुंबई शहराचे उप शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई मध्ये झालं, ते उपशहर कसलं !!! तर मुंबई शहारा चा भर कमी करण्यासाठी वसवलेली एक औदयोगिक वसाहत होती जी सिडको अंतरगत विकसित झाली होती. हे झालं 30 वर्षांपूर्वीच आता विषय असा की हे सांगायचं कारण काय तर ” मुंबई “!!! आता या मायानगरी वरचा भर वाढला आहे आणि परत तश्याच एका नव्या मुंबई ची गरज आहे मात्र हे आता काही सहज शक्य नाही दिसतंय आणि बालवाडी चा विषय का तर या इयत्ते पासून चवथी पर्यंत असलेला विषय “आपले परिसर”!!! या विषयामध्ये आम्हाला सगळं काही शिकायला मिळालं म्हणजे काय तर हात कसे धुवावे ते कपडे का इस्त्री करावे आणि साथीचे रोग ते संसर्ग काय इथं पर्यंत; हा विषय आता अभ्यासक्रमा मधून वागला आहे हो. सुफेन आणि दुश्फेन पाण्यातील फरक पण सांगावा या विषयामध्ये ! आता झालंय असं की शिक्षणाचा उपयोग फक्त्त भाकरी मिळवून देण्या इथपत चं राहिला आहे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी? करा नवीन विषयाची ओळख काय तर पेर्सोनालिटी डेव्हलोपमेंट ! मित्रहो आपल्या 12 वी च्या संसान्स च्या पुस्तकात या तथाकथित कोरोना आजाराचा उल्लेख आहे ! मात्र ते दुर्लक्षित राहिलं. आज या आजाराने आख्या जगात थयमान घातलं आहे, खरंच का हा आजार एवढा भयानक आहे तर हो कारण काय तर एकच “वेळ असतांना केलेलं दुर्लक्ष !” मग आता काय? काही नाही ! तुम्ही पाडलेलं संशोधनामधलं आंतर आता प्रत्येकाने एकमेकांनमध्ये ठेवायचं आणि संसर्ग टाळायचा ! साथीच्या रोगांसाठी लस असते संसर्गासाठी नसते त्यासाठी एकच असतं ते स्वतःला ओळखायचं आणि संपर्क टाळायचा. आपल्या पंतप्रधानानी आज संकल्प दिवस ठरवला याच काय कारण असेल तर एकच कारण आहे की कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी आपण निश्चय करायचा आणि तो पाळायचा हे झालं आपल्या  मानसिक सामर्थ्यासाठी पण आजून पुढं काय मांडलं आहे याच गणित कोणालाच माहित नाही आजच चीनने शोकदिन पळाला होता ते पण एक मानसिक दायीत्व होतं समाजासाठी. समाज असेल तर आपण असुत नाही तर काही नाही हे आता या आजाराला तोंड देणाऱ्या कुटुंबालाच कळत असेल बाकी सगळेच बघ्याच्या भूमिकेलीत श्रोते आहेत ( श्रोते आवारजून म्हणातोय कारण दिसत असतं तर आपण विपर्यास नसता केला ) सर्वकाही दिसूनही तोच मूर्खपणा असेल तर आपण डोळस मूर्ख आहोत हे नक्कीच. परिणामी संपर्क टाळा शहरांवरचा वाजवी भार टाळा. रोजगार मिळवा पण आपला खर्च (Expenditure) याचा पण विचार करा. आज आपला गाव बरा असं म्हणायची वेळ आली आहे कारण काय तर लोकसंख्येची कमी घनता ! स्वछ आणि पोषक खा, गरज असेल तर प्रवास करा यात पर्यटन हा विषय वेगळा…तुम्हाला जर आज कोणी फुकट विजा आणि पासपोर्ट दिला व सांगितले की ये चायना, अमेरिका, फ्रांस,  मलाया, अबुधाबी फिरून तर नक्कीच आपलं उत्तर नको असेल, आता का नको? कारण हा आजार द्याल पण वास्तव ते नाही गरज नसताना का फिरू हे असणार, परिणामी गरज आणि स्वच्छता या आजच्या घडीला एका नाण्याच्या दोन बाजू झाल्यात. मी मनस्वी भारताच्या आर्या कुळाचे आभार मानतो कारण यातच आपल्या स्वच्छतेची  आणि प्रार्थना पावित्र्य आणि कर्माची सांगड घातली आहे नाही तर आपण आज पूजेला हातपाय धुवून नसतो बसलो ! शासन आपल्यापरीने प्रयत्न करत आहे आपण ही त्यात सामील होऊन समाज टिकवावा आणि राष्ट्र बांधणीत योगदान द्यावे, नाही तर आपली फसगत “मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा” अशी झाल्या शिवाय राहणार नाही कारण हॅन्ड वॉश विकणारी अमेरिका आज हजारो च्या पटीने चितपट होतेय आणि 150 वर्ष राज्य केलेल्या युरोपचे कथित युवराज व पंतप्रधान पण संसर्गाची लागण होऊन घरात बसलेत… म्हूणन मित्रांनो जागा राष्ट्र घडवा पिढ्या सुधरवा…..
जय हिंद जय भारत !

by:नि 3

ज्ञान आणि विश्वास

खूप प्रेम करणारी व्यक्ती जर अज्ञान आणि अविश्वासाने वागत असेल तर त्याला कसं प्रेम म्हणावं? कारण अज्ञानाने आपण आपल्या विकासाचा मार्ग बंद करून घेतो. मग विकास म्हणजे तरी काय? तर विकास म्हणजे आपल्यातल्या कमतरतेत अधिक चांगल्या गोष्टीची भर घालणे म्हणजेच सकारात्मक गोष्टी घेणे आणि नकारात्मक टाळणे… शिवाय ज्ञानाच्या म्हणजेच विकासाच्या आवडीने आपण वेगवेगळ्या संकल्पना शोधत असतो आणि त्यात कायम नावीन्य टिकवून अथवा निर्माण करून आपल्या वर्तनाचा विकास करत असतो थोडक्यात नावीन्य नाही तर गोडी नाही आणि अशी गोडी नसणे माणसाला निरुत्साही करून पुन्हां नकारात्मक बनवते; मुळात आपल्याला जे टाळायचं होतं ती ही गोष्ट. अविश्वासाबद्दल काय बोलायचं तो तर वास्तवतेचा चेहराच लपवतो. जवळचा अथवा लांबचा कोणावरही अविश्वास दाखवण म्हणजे त्या व्यक्तीला अप्रत्यक्षरीत्या कुकृत्य वा तशी गोष्ट करण्यास प्रवृत्त करणं आणि त्याच्या उलटपक्षी विश्वास दाखवणं म्हणजे कुकृत्य करण्याची इच्छा असणाऱ्या मनाला पण असं काही करण्यापासून परावृत्त करणं. By नि3

गणेशोत्सव आणि आपण

लेख : गणेशोत्सव आणि आपण

महिन्याभरा पूर्वी 1ऑगस्ट होता तिथी विशेष लो. टिळकांची पुण्यतिथी आणि उद्या 2 सप्टेंबर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन. वास्तविक पाहता टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली आणि घराघरातील बाप्पा सार्वजनिकरित्या बसवला जाऊ लागला खूप चांगलं झालं जाती धर्माच्या भिंती नावाला का होईना पण कमी झाल्या आज त्या पाळल्या जातं नाहीत असं आपण समजू…मात्र बाप्पाचं काय !!! आज सार्वजनिक गणेशोत्सव प्रत्येक चवका-चवकात आला आणि आता त्याचं एवढं generalisation ( मराठीत समजत नाही!!! इंग्लिश मध्ये सांगू??? generalisation म्हणजे सामान्यीकरण ) झालं की तो आता गेलो-गल्लीत बसवला जाऊ लागला ! बसवा काहीच हरकत नाही पण बाप्प्पाला आपण आणतो सोडायला जातो तेंव्हा बरेच प्रश्न आपल्या समोर येतात पहिला तर law nd order चा त्या नंतर स्वच्छतेचा आणि शेवटी वेगवेगळ्या प्रदूषणाचा !
“पण बाप्पाला daring होतं नाही बरं का तुम्हाला असं का? म्हणून विचारायची कारण तुम्ही रीतसर मंडळ नोंदवलेली असतात; त्यातून काही चूक जिला वास्तवात चूक असं म्हणतच येत नाही आणि म्हणालातच तर देव पाप करतो वगैरे…वगैरे…ती चूक नसतेच ओ तिला काही म्हणताच येत नाही ती देवावरची श्रद्धा असते बरं पुढं…पण बाप्पाला तुम्हाला ” असं का? ” हा प्रश्नच विचारता येत नाही जरी काही चूक झाली तर त्या चुकीची भरपाई तुम्ही दंड म्हणून देता आता कुणाच्या मनात पुण्याचा दगडूशेठ आला असेल तर तो एक योगायोगच म्हणावा मात्र तसं नाही शेवटी बाप्पा एकदाच तर येतात की हो !
बाकीच्या सगळ्या गोष्टींना handle करायला मंडळाचे अध्यक्ष समर्थ असतात मग ते कोणत्याही प्रकारची तयारी ठेवतात “साम-दाम-दंड-भेद” बाप्पासाठी आमची लोकं भीत नाहीत कुणाच्या पप्पाला चालू द्या हाच आदर्श आहे आपण आपल्या थोर विचारवंतांकडून घेतलेला शेवटी आपण टिळकांचाच आदर्श घेतलाय “मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफली नाही उचलणार”
लेख उपरोधात्मक आहे कुणाला दुखावण्यासाठी नाही मात्र समजावण्यासाठीच ! या संस्थे मार्फत बऱ्याच समाजोपयोगी गोष्टी हाती घेतल्या जातात आपण अशा समाज कार्यात सहभागी होऊन सामाजिक आदर्श घालावेत जेणे करून पुढच्या पिढीला आदर्शांची ओळख राहील !

घालमेल ते घाल ‘मेळ’

घालमेल ते घाल ‘मेळ’…..
विषय असा की, आज ही आपण matrimonial sites वर profile बनवतो वा पाहतो तेव्हा पञिके चा अट्टास लावतो…किव  येते या मानसिकतेची कारण लग्नासाठी आत्ता च्या जमाण्यत पञिकांन पेक्षा स्वभाव जुळून खूप महत्त्वाचं आहे , पण नाही आपण आपल्या मागासलेल्या विचारांना बगल द्यायाला तयार नाही आहोत कारण साधारणच आहे म्हणे भविष्यात अडचणी येतील पण एकीकडे आपण  विज्ञानाच्या प्रगतीवारच शंका घेतोय हे ही समजन आपणास मुशकील एवढं जग पुढ आलय आणि आपण तिथच मग नंतर काय असतं आपल्याकडे…!
आरे आहे ना आम्ही सगळ्यात आधी विमानाचा शोध लावलाय पण तो पुराणातील कथांमधे हे एका विज्ञान परिषदेत सांगावे लागत तिच ही किव !!
शोध तर भारतातच अधिक लागतात माञ त्यांचा स्वीकार  खूप कमी आहे शोधां बरोबर मानसिकतेतला बदल ही तितकाच गरजेचा आहे ! by : नि3

सलाम दातृत्वाला आणि त्यांच्या कर्तुत्वाला…!

सलाम दातृत्वाला आणि त्यांच्या कर्तुत्वाला…!

माणसाचं आयुष्य हे शेतातल्या पिकासारखं असतं, ज्याला वर्षभरा आधी वेळेच्या वसरूपात गुंतवावं लागतं मग नंतर कापनीच्या वेळी यशाची जग्गड फळं मिळतात…मात्र काही कारणानी आयुष्य काळजीने घेरल जातं…विशेष तर आपण ज्यांच्या सहवासात आहोत त्या लोकांच्या भूत, भविष्य आणि वर्तमानतीत माहितीने वा वागण्याने. दुःख याच नाही की काळजी पडली आहे तर दुःख याच आहे की “आपण जिथं वेळ गुंतवतोय तिथं ती गुंतवण्यात कमी पडतोय का…? की मी चुकतोय योग्य ठिकाणी वेळ गुंतवण्यात…? गरज होती की नव्हती या पेक्षाही हीच योग्य वेळ होती का…?” या विवंचनेने व्यतीत होतो. आपलं वागणं आपल्या हातात असतं मात्र दुसऱ्याचं नाही. आपण कितीही समजदारी दाखवली तरी त्यांना फरक फारसा पडत नाही कारण ते त्यांच्याच विश्वात जगत असतात त्यांना तुमच्या विचारांचं सोडाच स्वपनांशी ही काही देणंघेणं नसतं. परिणामी हतबल होऊन जेंव्हा आपण हात टेकतो तेव्हा माघून नेहमीच धीर देणारा आणि कायम प्रेरित करणारा आवाज येतो… जे स्वप्न तू पाहिलं आहेस ते तुझं एकट्याच नाही आमचं देखील आहे तू एकटा नाही हरणार आम्ही पण हारुत; तूला आवरायचंय स्वतःला आणि पुन्हा भरारी घ्यायची आहे त्या राखेतल्या खसकन उडणाऱ्या फिनिक्स पक्ष्या सारखी; प्रवास कितीही समुद्र पार करण्याचा असो तूला अशी मुभा नाही की तू समुद्रात आत्माहूती देऊन या भौतिक जगाचा निरोप घ्यावा तर तूला मुभाच तेंव्हा आहे जेंव्हा तू जिंकशील आणि या भावविश्वाला ओलांडशील…! सलाम अश्याच व्यक्तिमत्त्वांना जे कायम प्रेरणा देतात, धीर देतात आणि आपल्याला कितीही अवघड प्रसंग आला तरी लढण्याची ताकद देतात…!

By: नि3

Design a site like this with WordPress.com
Get started